सांगली : चार दिवसापुर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीची नोंदणी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लाचेची मागणी करीत असल्याचा आरोप करणार्‍या तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडेगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे व धमकी देण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

कडेगाव विश्रामधाम येथे वाहन नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन केले असता  कडेगाव तालुका फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची नोंदणी करण्यासाठी प्रमोद मांडवे हे गेले होते. यावेळी ट्रॉली पाहिल्याविना नोंदणी करता येत नसल्याचे परिवहवन विभागाच्या निरीक्षकांनी सांगितले. मात्र, यासाठी दहा हजारांची लाच दलालामार्फत मागितली जात आहे असे सांगत मांडवे यांनी कपडे उतरवून आरटीओ अधिकाऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. १२ ऑक्टोंबर रोजी घडलेल्या या घटनेची चित्रफित शनिवारी समाज माध्यमावर प्रसारित झाली होती.

हेही वाचा : आधी भास्कर जाधवांनी केली नक्कल, आता नितेश राणे यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मुलगा एवढा वात्रट…”

यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजल्यानंतर मोटार वाहन निरीक्षक रोहन सासणे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री संबंधित तरूणाविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल व अंगावर धावून जाउन आरडाओरडा केला म्हणून तक्रार दाखल केल्यानंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, उप प्रादेशिक विभागातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, या विभागातील बहुसंख्य नोंदी ऑनलाईनच होत असतात. मात्र, ट्रॅक्टर ट्रॉलीची नोंदणी पाहणीनंतरच करावी लागत असल्याने ट्रॉली दाखविण्यास  सांगण्यात  आले होते. मात्र, यातून तरूणाने गैरसमज करून हा प्रकार केला असल्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against youth stripped rto officer clothes asking bribekadegaon sangli tmb 01