खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
संजय राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय त्यांच्याविरोधात शिवसेना(शिंदे गट) नेतेही आक्रमक झाले आहेत. शीतल म्हात्रे यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. आज राऊत यांच्या फोटोला चप्पल मारली आहे. त्यांनी असेच आरोप केले तर महिला सेनेला त्यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे. तसेच राऊतांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला म्हात्रे यांनी दिला आहे.
श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया –
मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर टोलेबाजी केली आहे.