जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती, कर्मचाऱ्यांची बढती आणि अन्याय्य बदल्या, या विषयांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा मंगळवारी पांडवनगरी परिसरातील भीष्म वसाहतीत सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा मेळावा होणार आहे.
मेळाव्यात महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष एकनाथ मोरे, विभागीय सचिव उदय लोखंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.
केंद्र व राज्य सरकारी तसेच निमशासकीय, अशासकीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची शासनमान्य प्रातिनिधिक संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ ओळखला जातो. या मेळाव्यास कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन केले जाणार असून मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी बीड येथील एस. टी. गायकवाड, नागपूरचे अरुण गाडे, अहमदनगरचे विलास बोर्डे, गुणवंत खुरंगळे, हे केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे महासचिव करुणासागर पगारे, सुमन वाघ, नानासाहेब पटाईत, गोविंदराव कटारे, शिवाजी शार्दूल, रखमाजी सुपारे, शांताराम साळवे यांनी केले आहे.

Story img Loader