काळय़ा बाजारात विक्रीसाठी चालवला जात असल्याच्या संशयावरून नगर शहर वाहतूक पोलिसांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या ४३० गोण्या तांदूळ पकडला. ही वाहतूक करणारी सुमारे १२ लाख रुपयांची मालमोटारही ताब्यात घेण्यात आली आहे. तांदूळ स्वस्त धान्य दुकानांसाठी वितरित केला होता काय, याची चौकशी करून फिर्याद दाखल करण्यासाठी वाहतूक शाखेने नगर तहसीलदारांना पत्र दिले. मात्र त्याची तहसील कार्यालयाने सायंकाळपर्यंत दखल घेतली नव्हती.
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सोलापूर रस्त्यावरील चांदणी चौक ते पत्रकार चौक दरम्यान पाठलाग करत ही कारवाई केली. मालमोटारीत (केए २८ बी ४४२९) ५० किलो वजनाच्या ४३० गोण्यांत तांदूळ होता. त्याची किंमत सुमारे ४ लाख आहे. मालमोटर वाहतूक शाखेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. पोलिसांनी चालक व क्लिनरला ताब्यात घेतले आहे. मालमोटर कर्नाटकातील बिदर येथून गुजरातमधील अहमदाबादकडे चालली होती.
वाहतूक शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर ढेकणे, सहायक निरीक्षक एस. एस. सानप, हवालदार बी. एस. बडदे, बी. बी. दौंड, कवास्ते यांनी तांदळाची संशयास्पद वाहतूक करणारी मालमोटार पकडली.

Story img Loader