सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटी वसूली प्रकरणी ५९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. देशमुखांसोबत संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्यावरही आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची लवकरच सुनावणी होणार आहे.

२१ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे केंद्रीय तपास संस्थेने २१ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. २० मार्च २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी आरोप केला होता की, देशमुख यांनी सचिन वाजेसह काही मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.

सचिन वझे बनणार सरकारी साक्षीदार
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने देशमुख यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या १०० कोटी वसूली प्रकरणात सरकारी साक्षीदार होण्यासाठी सचिन वझे यांना नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारमधून स्फोटके जप्त केल्याप्रकरणी एनआयईने वाजे यांना अटक केली होती.

Story img Loader