IPS Bhagyashree Navtake Bhaichand Hirachand Raisoni Credit Society : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, तसेच कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी सीबीआयने नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवटाके यांनी यांनी १,२०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. यात त्यांनी उचित कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होत आहे.

नवटाके यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपायुक्त नवटाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्यात आला असून आता सीबीआयने नवटाके यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

1 crore fraud in the name of fake bank guarantee Mumbai print news
बनावट बँक हमीच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक; बँकेच्या कर्मचाऱ्यासह ओडिसातील पाच जणांविरुद्ध गुन्हा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Pune bopdev ghat ganga rape case police investigation
तपासाच्या व्याप्तीत वाढ, ‘बोपदेव घाट’ प्रकरणी सराइत लुटारूंची चौकशी; आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके
Possession of fake notes not a crime High Court grants bail to accused
बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन…
karnataka cm siddaramaiah
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
High Court asked the state if there's evidence against Saurabh Tripathi and Ashutosh Mishra
अंगाडिया खंडणी प्रकरण : IPS अधिकरी सौरभ त्रिपाठींविरोधात पुरावे आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
fir registered against five including mumbai builder for cheating housing investors
सदनिकेच्या नावाखाली २१ कोटींची फसवणूकप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा, ३५ जणांची फसवणूक केल्याचा आरोप

हे ही वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी फरार आरोपी कुठे? मुंबई पोलिसांकडून अखेर लुक आऊट नोटीस जारी!

या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर सीबीआयकडून याप्रकरणी पुरावे गोळा करण्यास सुरुवात

याप्रकरणी, पुणे जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांत नोव्हेंबर २०२० मध्ये गुन्हे दाखल झाले होते. त्या अनुषंगाने सुनील झंवर आणि कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस महासंचालकांकडून याबाबतचा चौकशी अहवाल गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशांनंतर आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Shyam Manav : “लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका, महायुतीतला हाकालायचं असल्यास…”, श्याम मानव यांचा मविआला सल्ला

नवटक्केंना यापूर्वी दलितविरोधी वक्तव्य भोवलं होतं

बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी कार्यरत असताना महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांना दलित बांधवांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे भोवलं होतं. त्यानंतर त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली होती.