केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अधिकृत संकेतस्थळासारखेच बनावट संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आल्याचे माहिती सीबीएसईने परिपत्रकाद्वारे दिली. पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे संदेश आणि संकेतस्थळाला कोणताही प्रतिसाद न देता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सीबीएसईने केले.
हेही वाचा >>> पुणे: जिल्ह्याचा पहिल्यांदाच एकत्रित विकास आराखडा; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक
सीबीएसईने या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळाचा http://www.cbse.gov.in हा पत्ता आहे. तर https://cbsegovt.com/ हा बनावट संकेतस्थळाचा पत्ता आहे. संबंधित बनावट संकेतस्थळाद्वारे दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी तयार करून डाऊनलोड करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना पैसे भरण्याबाबतचे संदेश पाठवण्यात येत आहेत. सीबीएसई दहावी आणि बारावीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी थेट विद्यार्थी, पालकांकडून थेट पैसे घेत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी फसवणूक करणाऱ्या संदेशांबाबत सावधगिरी बाळगावी, अधिकृत माहितीसाठी http://www.cbse.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीबीएसईने केले.