सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील १८ चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व नाक्यावर सीसी कॅमेरे बसविण्याचा फायदा गुन्हेगारी रोखण्यात होईल, असे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. कणकवली पोलीस ठाणे येथे तक्रार दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक त्रिमुखे आले असताना बोलत होते. सिंधुदुर्ग पोलिसांतर्फे तपासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, सीसीटीव्ही हे सुरक्षितता कडेकोट राखण्यासाठी पोलीस महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे ते म्हणाले.
ओसरगाव येथील बँक दरोडय़ातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर लोकरे याच्या मागावर सिंधुदुर्ग व सोलापूर पोलीस आहेत. सर्व बँकांना सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, असे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभे राहावे म्हणून पाठपुरावा सुरू आहे, तसेच बँक सुरक्षेच्या दृष्टीने बँकांनी नियमांचे पालन करावे, असे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी स्पष्ट केले.
कणकवली पोलीस स्टेशन इमारतीसाठी २० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच काम सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत जिल्ह्य़ात १२०७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. क्राइम व लोकसंख्या यांचा तुलनात्मक विचार करून ही पदे मंजूर केलेली असतात. त्यातील काही रिक्त आहेत. तरीही चेक पोस्टवरील पोलिसांची संख्या वाढविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा