वाई : साताऱ्यात शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्या जोरदार चुरशीची लढत झाली. पहिल्या फेरीपासून शशिकांत शिंदे मताधिक्यात आघाडी घेतली होती. ती आघाडी २१ ते २५ हजारापर्यंत होती. शशिकांत शिंदे विजय होणार असे चित्र साताऱ्यात सर्वत्र निर्माण झाले होते.
यामुळे शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी व शशिकांत शिंदे यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडत कोरेगावमध्ये मिरवणूक काढली होती. वाई, कराड, जावली येथेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दुपारीच गुलालाची उधळण करत फटाके लावले फोडले. सर्वत्र शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे फलक( फ्लेक्स) लागले होते. शशिकांत शिंदे यांनाही कार्यकर्त्यांनी गुलाल भरवले होते. शशिकांत शिंदे यांनीही साताऱ्यातील मतदारांचे आभार मानत माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
आणखी वाचा-साताऱ्यात उदयनराजे विजयी, शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार मतांनी केला पराभव
मात्र पंधराव्या फेरीनंतर शिंदे यांचे मताधिक्य घटायला सुरुवात झाली. ताबडतोबीने कोरेगावात सुरू असणारी मिरवणूक थांबविण्यात आली. साताऱ्याकडे निघालेले शशिकांत शिंदे कोरेगावातील घरी परत फिरले. शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स उतरवले. तेव्हा शिंदे यांचे मताधिक्य पाच लाखांवर होते. मतमोजणीत अचानक झालेल्या बदलाने साताऱ्यात सर्वत्र आश्चर्य होतं होऊ लागले. सर्वजण माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून नक्की काय असं काय घडलं आहे का असे प्रश्न विचारू लागले. शशिकांत शिंदे यांची आघाडी तोडून उदयनराजे यांचे मताधिक्य वाढू लागताच कार्यकर्त्यांनी सातारा शहरात एकच जल्लोष केला.
यावेळी उदयनराजे जलमंदिर निवासस्थानीच होते. आपला पराभव दिसू लागल्याने ते घरीच बसून होते. कार्यकर्ते उदयनराजे कडे गेले व त्यांना विजयी झाल्याचे सांगितले. उदयनराजे भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत दमयंतराजे भोसले होत्या. यानंतर साताऱ्यात जल्लोषी वातावरण झाले. सातारा शहरातून उदयनराजेंची मोठी मिरवणूक काढण्यात आली. शशिकांत शिंदे यांना पाच लाख ३१ हजार १३२ मते मिळाली उदयनराजे ३२ हजार(५ लाख ६३ हजार १६७) पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर राहिले.