राज्यात येणारे काही महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिकची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर उभारण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पाअगोदर या टेक्स्टाईल पार्कची घोषणा केंद्र सरकारकडून होण्याची शक्यता आहे. मुंबईत पत्रकार परिषदे बोलत असताना फडणवीस यांनी वरील माहिती दिली.

हेही वाचा >>>> राज्य सरकारचा मोठा निर्णय! शिंदे गटातील ५१ आमदार- खासदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा, अमृता फडणवीसांच्या सुरक्षेतही वाढ

Mumbai provision of Rs 200 crore has made from SIDBI for startups in state
राज्यात नावीन्यता शहरांची स्थापना, स्टार्टअपसाठी २०० कोटी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai State Labor Insurance Society decided to set up 18 new hospitals for workers
राज्यात ईएसआयसी १८ नवी रुग्णालये उभारणार, रायगडमध्ये सर्वाधिक चार रुग्णालये, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
District administration issues notice to organizers regarding children attending Coldplay concert navi Mumbai news
कोल्डप्ले संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर निर्बंध; जिल्हा प्रशासनाकडून आयोजकांना सूचना
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
Abhay yojana for property tax and water bill exemption in Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी सवलतीची अभय योजना
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती

मी केंद्र सरकारचे आभार मानतो. आजच केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा केली आहे. आगामी काळात महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही एक भेटच आहे. नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून टेक्सटाईल पार्कदेखील मिळणार आहे. यातून महाराष्ट्रात टेक्स्टाईल पार्क उभा राहण्यास मदत होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात आहे. मी त्याची माहिती घेतली आहे. नवीन वर्षात आर्थसंकल्प सादर होईपर्यंत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> फडणवीसांची मोठी घोषणा! पुण्यात उभा राहणार २००० कोटींचा प्रकल्प, मोदी सरकारकडून ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ला मंजुरी

आमचे सरकार येऊन फक्त तीन महिने झालेले आहेत. असे असताना महाराष्ट्रातून उद्योग जात आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यासाठी काही राजकीय पक्ष, त्यांची यंत्रणा यांनी मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे. महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत भयानक कांड झाले. त्यामुळे महाराष्ट्रात येण्यास कोणीही तयार नव्हतं. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कोणीही तयार नव्हतं. ही विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

Story img Loader