जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड उद्या (शुक्रवारी) होणार आहे. दोन माजी अध्यक्षांनी संचालक झालेल्या आपल्या वारस मुलांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यासाठी जोरदार लॉबिंग केली आहे. एका माजी अध्यक्षाने आर्थिक अडचणीत असलेल्या बँकेला दोन वर्षांत पूर्वपदावर आणण्यासाठी आपले अर्थकारणातील कसब पणाला लावू, या साठी आपल्या मुलाला संधी देण्याची मागणी केली. मात्र, सर्वसामान्य जनतेत बँकेच्या जुन्या कारभाऱ्यांविरुद्ध प्रचंड नाराजी असल्याने पालकमंत्री पंकजा मुंडे काय निर्णय घेतात व बँकेच्या चाव्या कोणाच्या हातात देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आदित्य सारडा, दत्ता पाटील, अॅड. सर्जेराव तांदळे यांची नावे चच्रेत आहेत.
बाराशे कोटींच्या ठेवी असताना तत्कालीन अध्यक्ष व संचालकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा बँक आíथक अडचणीत सापडली. बहुतांशी संचालकांवर बनावट कर्जप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने बँक पूर्ण बंद पडली. पाच वर्षांनंतर बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. १९ पकी १६ संचालक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे, तर ३ संचालक राष्ट्रवादीचे निवडून आले. बँकेचे नेतृत्व मुंडे यांच्याकडे आले. गुन्हा दाखल झालेले माजी अध्यक्ष सुभाष सारडा व राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या मुलांना बँकेत संचालक बनवले. मुलाच्या माध्यमातून बँकेचा कारभार पुन्हा आपल्या हाती ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बँकेला पूर्वपदावर आणण्यास, तसेच लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी बँकेचा कारभार नव्या लोकांच्या हाती द्यावा, अशी लोकभावना आहे. अॅड. सर्जेराव तांदळे, दत्ता पाटील, ऋषिकेश आडसकर यांची नावे चच्रेत आहेत. मात्र, आíथक संस्था भांडवलाशिवाय चालत नाहीत आणि भांडवल उभे करण्यासाठी आíथक पत आवश्यक असते, असा मुद्दा पुढे करत माजी अध्यक्षांनी आपल्या मुलांना खुर्चीवर बसविण्यास प्रयत्न सुरू केले. दोन दिवस वेगवेगळी शिष्टमंडळे मुंबईत पंकजा मुंडे यांना भेटून आली. नेहमीप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक तास पालकमंत्री भ्रमणध्वनीवरून अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे नाव सांगतील. त्यानंतर सभागृहात निवड होईल.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची आज निवड
जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड उद्या (शुक्रवारी) होणार आहे. दोन माजी अध्यक्षांनी संचालक झालेल्या आपल्या वारस मुलांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यासाठी जोरदार लॉबिंग केली आहे.
First published on: 15-05-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chairmen selection of district bank today