श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग…माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड…दिंडीतील वारकर्‍यांच्या पायांनी धरलेला ठेका…टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवरचा पहिल्या उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा ‘चांदोबाचा लिंब’ येथे उत्साहात पार पडला. हरी नामाच्या गजरात दुमदुमते आसमान व वरुण राजाचा हलका शिडकावा. या आल्हाददायी वातावरणात लाखो नेत्रांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथून शनिवारी दुपारी मध्यान्ह आरती झाल्यानंतर दीड दिवसांच्या मुक्कामानंतर हरिनामाच्या गजरात तरडगाव मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. माऊलींचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. फलटणच्या कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे माऊलींचे स्वागत फलटण तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदी मान्यवरांनी स्वागत केले. पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सार्‍या विठ्ठलभक्त वारकर्‍यांना वेध लागले होते. ते या सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील वारकर्‍याची व भाविकांची पावले लगबगीने चांदोबाच्या लिंब या दिशेने पडत होती. हा सोहळा जसा पुढे पुढे सरकत होता, तसा रस्त्यांच्या दुतर्फा असणार्‍या स्थानिक नागरिकांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसांडून वाहत होता. रस्त्याकडील बाजूला असणार्‍या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूडं, भजने रंगली होती.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Raigad Chi Waghin | Viral Video
VIDEO : रायगडची वाघीन! शिवप्रेमीची दुचाकी एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..

माऊलीचे उभे रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमधील भाविक भक्त व वारकर्‍यांनी या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान माऊलींचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला तेव्हा गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी, पालखी सोहळ्यातील बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सुचना न देता वारकर्‍यांच्या गर्दीतील लाखो वारकरी दुतर्फा झाले व मध्ये अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. रिंगण लाऊन घेतल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्‍व पुजार्‍यांनी दौडत आणला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्‍व मगील दिंड्यापर्यंत नेल्यांनतर पुन्हा परत माघारी पळत आला. माऊलींच्या रथाजवळ अश्‍व आल्यांनतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्‍याचा नैवद्य दाखविला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आशीर्वाद असतो, या भावनेने अश्व ज्या ठिकाणाहून गेला. तेथील त्याच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. अशा तऱ्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. या नंतर पालखी सोहळा तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगाव येथील पालखी तळावर विसावला.