महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. अशीच एक सभा काल संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडली. या सभेमध्ये शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. “एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले?” असा प्रश्न खैरे यांनी जाहीर सभेमध्ये उपस्थित करत शिंदेंवर टीका केली.

नक्की वाचा >> नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुर्मू यांचं अभिनंदन करणारी मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; फोटो ठरतोय चर्चेचा विषय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच येथे जमलेले सर्वजण हे ठाकरेंच्या पाठीशी आहेत, असं सांगितलं. “इथे जे जमले आहेत ते ठाकरे परिवाराचे समर्थक आहेत. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आपण (आदित्य ठाकरे),” असं खैरे मंचावर बसलेल्या आदित्य ठाकरेंकडे पाहत म्हणाले. पुढे बोलताना, “आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं,” असं ते म्हणाले.

नक्की वाचा >> ‘हे सरकार बेकायदेशीर असून लवकरच कोसळणार’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “ज्यांना स्वत:चं…”

खैरे यांनी या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंवर जाहीर टीका केली. “मला एक आश्चर्य वाटतं १९८८ च्या नंतर एक रिक्षावाला एवढे कोट्यवधी रुपये कसे जमा करु शकतो?” असा प्रश्न उपस्थित करत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. “त्यांच्या पाठीमागे ईडी का नाही. आमच्या एक एका कार्यकर्त्यांमागे ईडी लावता तुम्ही तर यांच्या पाठीमागे का नाही?” असा प्रश्नही खैरे यांनी विचारला.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> …अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आदित्य ठाकरेंचा ताफा थांबला

“५०-५० खोके दिले (बंडखोर आमदारांना). किती खर्च केले? इतके पैसे कुठून आणले रिक्षावाला असणाऱ्या दाढीने? किती लुटले?” असे प्रश्नही खैरे यांनी विचारले. तसेच पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असणाऱ्या आनंद दिघेंचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. “आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाखाली तू मोठा झाला आणि आनंद दिघेंना विसरुन गेला. त्यांच्या चित्रपटात दाखवलंय ना गद्दारांना क्षमा नाही. काही लपणार नाही. मुंबई ठाण्याच्या लोकांना कळू लागलंय,” असंही खैरे म्हणाले.