भगवद्गीता केवळ धर्मग्रंथच नव्हेतर विश्वासाठीचे तत्वज्ञान असल्याचे सांगताना मात्र, त्याचा आमच्या अभ्यासक्रमात समावेश नाही. छत्रपती शिवरायांवरील धडा दोन पानी, तर देशाची घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धडा एक पानीच असल्याची खंत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> सांगली : विदेशी पाहुण्यांसाठी मिरजेतून सरस्वती वीणा

कराडमध्ये शिक्षण मंडळ संस्था व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, अनिल हुद्देदार, चंद्रशेखर देशपांडे, अनघा परांडकर आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, की भगवद्गीता हा केवळ हिंदूचा किंवा एका धर्माचा ग्रंथ नाही. तर तो संपूर्ण जगाला कसे जगावे अन् कसे जगू नये, असे सांगणारे तत्वज्ञान आहे. परंतु, त्याचा आमच्या अभ्यासक्रमात समावेश नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य मोठे आहे. पण, अभ्यासक्रमात त्यांचा धडा दोन पानी, तर देशाची घटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धडा एक पानी असून, आताच्या अभ्यासक्रमात फाफटपसाराच जास्त आहे. त्यात इंग्लड, इंडोनिया आदी. देशांच्या असलेल्या  भूगोलाचा आम्हाला काय उपयोग, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>> “इकबालसिंह चहल यांना चौकशीला बोलावलं, याचाच अर्थ…”, अनिल परबांचा शिंदे सरकारला अप्रत्यक्ष टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या जून महिन्यापासून केली जाणार आहे. त्यानुसार संपूर्ण देशात तीन वर्षाचा एकच अभ्यासक्रम असले. या नव्या शैक्षणिक धोरणातून राष्ट्राचा मूळ विचार माहिती होईल. त्यातून उत्तम नागरिक घडतील असा विश्वास मंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.