मी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतो. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असं राज्याचे मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत माझ्यावर दोनदा शाई फेकण्यात आली. पण मी लगेच कामाला लागलो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील हे आज अमरावती दौऱ्यावर होते. पालकमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दर आठवड्याला अमरावतीत यावं असा माझा संकल्प आहे. मेळघाटात मोठा निधी जातो पण अमलबजावणी होत नाही हे माझ्या निदर्शनास आलं आहे त्यामुळे मी मेळघाटात जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भीम आर्मीने शाईफेक केली होती. राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाचा निषेध नोंदवत त्यांनी शाई फेकली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीत बोलत असताना त्यांनी यावर भाष्य केलं. माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात. शाई फेकली की मी लगेच दुसरा शर्ट घालतो, आत्तापर्यंत दोनदा शाई फेकण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला शर्ट बदलून बाहेर पडतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. कंत्राटी भरती विरोधात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी करत हे कृत्य केलं होतं. चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil on shai fake solapur incident amravati visit scj