“एकंदरीत माझा तो बळवंतराव दुसऱ्यांचा तो बाब्या, असं महाविकास आघाडी सरकारचं चाललंय, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोललं तरी चालतं, पंतप्रधानांवर टीका केली तरी चालते. पण भाजपामधील मंत्र्यांनी एक शब्द जरी बोलला तरी त्यांच्यावर कारवाई होते. भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हटलं होतं, फूलन देवी नाही, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, राबडीदेवी शिवी नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गजारियांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.

“जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडीदेवी म्हटलं यात काहीच गैर नाही. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी राज्य सांभाळलं होतं. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे रश्मी ठाकरे या देखील राबडीदेवी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतात, त्यामुळे राबडीदेवी म्हणून गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली, फूलनदेवी म्हटलेलं नाही, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, याप्रकरणी आम्ही त्यांना समज दिलीय. भाजपाची महिलांबद्दल योग्य शब्दांत बोलण्याची संस्कृती आहे,” असं पाटील म्हणाले.

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Uddhav Thackeray Narendra Modi (4)
“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”

ठाकरे सरकारच्या नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले, “हे सरकार गेंड्यापेक्षाही….”

“काँग्रेस नेते नाना पटोले पंतप्रधान मोदींना नौटंकी म्हणालेत, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पंजाब घटनेत अमित शाहांचा हात होता, असा आरोप केलाय, त्यामुळे पटोलेंविरोधात वॉरंट काढून अटक करा,” अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली.

नेमकं काय झालं होतं ?

भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले होते. जितेन गजारिया यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या ट्वीटवरुन सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना नोटीस पाठवत जबाब नोंदवून घेतला. दरम्यान हे ट्वीट नंतर जितेन गजारिया यांनी डिलीट केलं.