गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवेदन दिले होते. संपकरी कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर परतण्याचं आवाहन अनिल परब यांनी केलं होतं. उर्वरीत मागण्यांवर चर्चेची सरकारी तयारी असल्याचंही अनिल परब यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे असे विधान केल होते. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“मी अजित पवारांना सभागृहात एसटी संप संपवा आणि त्याचे श्रेय घ्या अशी चिठ्ठी पाठवली. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. दत्ता सामंत यांच्या संपामध्ये १ लाख घरे उद्धवस्त झाली हे आजही मला आठवत आहे. त्यामुळे पुन्हा एक लाख घरे उद्धवस्त होतील. त्यामुळेच मी त्यांनी चिठ्ठी पाठवली कारण त्यांच्याकडून आशा आहेत. अजित पवारांमध्ये धमक आहे. चार महिने एसटी कर्मचारी त्रस्त आहेत त्यामुळे तुम्ही प्रेमाने बोललात तर सगळे येतील,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

“ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंना आधी कोविडमुळे आता आजारपणामुळे हे शक्य नाही. मला त्यांची कुंडली बघायची आहे. काय भाग्यवान माणूस जन्माला आला आहे कोणी त्यांना हलवू शकत नाही. सगळ्यांची मजबूरी आहे. प्रश्न एकनाथ शिंदे, अजित पवार सोडवू शकत असल्याने लोक त्यांच्याकडे जातात. त्यामुळे एसटी संप संपवायचा असेल तर अजित पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार?

“एसटीचा प्रश्न आता सुटलेला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सभागृहात माहिती दिलेली आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून पगारवाढही केली गेली आहे. वर्षाला सुमारे ७५० कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. पगार वेळेत होणार आहेत. त्याची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली आहे. त्यामुळं ३१ मार्चपर्यंत जर कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्यानंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर कारवाईची भूमिका घेतली जाईल,” असा इशारा अजित पवार यांनी दिला.

राज्यातील विद्यार्थ्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

दरम्यान, राज्यातील एसटी सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून ग्रामीण भागात शाळा गाठण्यासाठी तासन्तास पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी ग्रामीण भागात एसटी फेऱ्यांचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिले असले तरीही सध्या धावत असलेल्या पाच हजार बसगाड्यांमधून राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची समस्या कशी सुटणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालावर सरकारने आतापर्यंत निर्णय घ्यायला हवा होता, असे एकीकडे सरकारला सुनावतानाच सरकारच्या निर्णयापर्यंत कर्मचारी रुजू झाले तर आभाळ कोसळणार आहे का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरही बोट ठेवले. या प्रश्नावर आत्महत्या हा उपाय नाही, तर कामावर रुजू होणे हा उपाय आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.