महाराष्ट्राच्या राजकारणात २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राजभवनावर झालेल्या शपथविधीने सर्वत्र खळबळ उडाली होती. विशेषता महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारणच यामुळे हादरलं होतं. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदाची शपथ दिली होती. मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आणि वेगवान नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं आणि भाजपाला विरोधात बसावं लागलं. या पहाटेच्या शपथविधीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं एक खळबळजनक विधान समोर आलं आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या खळबळजनक दाव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
या पहाटेच्या शपथविधीने गल्लीपासून ते दिल्लपर्यंतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
Written by मयूर रत्नपारखे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-01-2023 at 15:53 IST
TOPICSअजित पवारAjit Pawarचंद्रकांत पाटीलChandrakant Patilजयंत पाटीलJayant Patilदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभगतसिंह कोश्यारीBhagatsingh Koshyariभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
+ 4 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil reaction on jayant patil sensational claim regarding early morning swearing msr