राज्यातील करोना निर्बंधावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारने विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत टीका केली. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावत त्यांना मोदींचे नियम मान्य नसतील तर आम्ही तसं मोदींना कळवू असं मत व्यक्त केलं. यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफ यांना कागलच्या बाहेरचं काही समजत नाही, असं म्हणत टीका केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “हसन मुश्रीफ यांना कागलच्या बाहेरचे काही समजत नाही. राज्यात करोना नियंत्रणाबाबत एकसूत्री कारभाराचा अभाव आहे. शाळा सुरू ठेवायच्या, बंद करायच्या की ऑनलाइन सुरु ठेवायच्या याबाबतही समन्वय नाही. यावर भाजपचा आक्षेप आहे.”

mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Asaduddin Owaisi Bhiwandi Constituency, Waris Pathan,
मोदी हे भारतातील मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आरोप
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

हसन मुश्रीफ काय म्हणाले होते?

करोना निर्बंध लागू करताना राज्य शासनाने विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. यावर मुश्रीफ यांनी टोला लगावला. हसन मुश्रीफ म्हणाले, “केंद्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीप्रमाणे राज्य शासनाचे निर्बंध आहेत. नरेंद्र मोदी यांनी दिलेली नियमावली चंद्रकांत पाटील यांना मान्य नसेल, तर आम्ही मोदी यांना तसे कळवू.”

“परिवहन मंत्री सल्ला घेण्यासाठी शरद पवारांकडे जातात, पण सारे निर्णय…”

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांनाही टोला लगावला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ३ राज्यातील निवडणुका लढवणार असल्याचे विधान केले आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांची जप्त झालेली अनामत रक्कम, पराभव याचा कसलाही विचार न करता राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे. अन्य राज्यात निवडणुका लढवून आपला पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. असं असलं तरी त्यातून फारसे काही साध्य होणार नाही.”

“परिवहन मंत्री अनिल परब शरद पवार यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जातात. मात्र, सारे निर्णय पवार हेच घोषित करतात,” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला.

“फसवून पराभूत करणे ही काँग्रेसची परंपरा”

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप व भाजपच्या सहयोगी उमेदवारांना पराभूत करणे ही सत्ताधाऱ्यांची परंपराच आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे, अशोक चराटी आदींचा पराभव झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाची ताकद मर्यादित होती. अधिक जागा देणाऱ्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी आवाडे, चराटी यांना राजकारण करून पराभूत केले. फसवून पराभूत करणे ही त्यांची परंपराच आहे. तरीही जिल्हा बँकेमध्ये भाजपचे तीन सदस्य आहेत.”

“…म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली”

“शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. उद्या त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची ठरवले, तर त्यांना आमच्या संचालकांचा उपयोग होईल,” असे म्हणत त्यांनी नव्या राजकीय जोडणीला प्रतिसाद दिला.