शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पाटलांच्या या दाव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, दादा (चंद्रकांत पाटील) आतापर्यंत कुठे होते? ते त्यावेळी (विवादित इमारत पाडली तेव्हा) तिथे होते का? त्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास कसा ठेवायचा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत पाटील आज पत्रकार परिषदेत बोलत असताना, माध्यमांच्या प्रतिनिधींनी चंद्रकांत पाटील यांना जयंत पाटलांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोण जयंत पाटील? कोणत्या जयंत पाटलांबाबत तुम्ही बोलताय? प्रभू श्रीरामाचं नाव घेतलं तर पाल पडल्यासारखं करतात ते आम्हाला काय शिकवणार. तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांबाबत बोलताय का? तेव्हा पत्रकारांनी सांगितलं की, तुमच्या शेजारच्या गावातल्या जयंत पाटलांबाबत (राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष) विचारतोय.

माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, जयंतराव पाटील काय म्हणतात, हिंदुत्वाच्या विषयावर काय बोलतात याची मी काळजी करण्याची गरज नाही. उद्धवजी (उद्धव ठाकरे) काय म्हणतात याची मी काळजी केली पाहिजे. त्यामुळे मी ताबडतोब त्यांना फोन करेन. कारण आमचे तसे संबंध आहेत. मी त्यांना विचारेन, उद्धवजी तुम्ही माझ्याबद्दल असा का गैरसमज करताय? बाळासाहेबांबद्दल मी असा अश्रद्धेने बोलेन का? परंतु जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर मी काशाला बोलू.

हे ही वाचा >> “बाबरी पाडण्यात शिवसैनिक नव्हते”, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत म्हणाले…

बाळासाहेबांबद्दल चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील काल एका मुलाखतीत म्हणाले की, “त्यावेळी मशीद पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते का? शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil says will take care of what uddhav thackeray says babri masjid shiv sena asc
Show comments