Chandrakant Patil Comment on Nana Patole: देशातील राष्ट्रपतीपदाच्या १६ व्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळतील असा विश्वास महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनिमित्त मतदान करण्यासाठी भाजपाचे आमदार विधानभवनामध्ये आले त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. भाजपाचे आमदार आज देशभरातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये बसने दाखल झाले. मुंबईमध्येही हेच चित्र पहायला मिळालं. यावरुनच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंच्या या टीकेलाही उत्तर देताना भाजपा बसमधून आमदार का आणतं याबद्दल खोचक शब्दांमध्ये भाष्य केलं.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना सोबत नसतानाही १० मतं अधिक पडली. तर विधानपरिषदेमध्येही शिवसेना सोबत नसताना २२ मतं अधिक मिळाली. आता शिवसेना सोबत आहे. शिवसेना भाजपा एकत्र मिळून फार जास्त मतं मिळतील. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे २०० मतं मिळतील असं सांगत असेल तरी त्यापेक्षाही अधिक मतं मिळतील,” असा दावा चंद्रकात पाटील यांनी केलाय.

नक्की वाचा >> ‘गरज पडली तर…’ ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधी…”

भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होणार आहे. “यशवंत सिन्हा यांच्यासाठी प्रचार, बैठकीही कमी झाल्या. त्यांचा दौराही रद्द झाला. त्यांच्या उमेदवारीमध्ये कोणाला रस आहे असं मला वाटतं नाही,” असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लागवला. उद्धवजींनी पाठींबा जाहीर केल्याने मतदानाचा आकडा १८२ झालाय. म्हणजे २०० ला १८ च मतं कमी आहेत. त्यामुळे २०० पेक्षा नक्कीच जास्त मतं मिळतील, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलंय.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा

भाजपा बसमधून आमदार आणतं, या नाना पटोलेंच्या टोल्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, भाजपा आपल्या पक्षाला एक कुटुंब मानतो. परिवाराच्या प्रत्येक सदस्याची आम्ही काळजी घेतो. ते आजारी असले तर कसे पोहोचणार. त्यांची खाण्याची, राहण्याची व्यवस्था आहे की नाही, ते विधानभवनामध्ये कसे पोहचणार यासारख्या गोष्टींची काळजी घेतो. भाजपा आपल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. म्हणूनच आम्ही सर्वांना एकत्र बोलवलं. एकत्र आले तर एक दोन आमदार नाहीयत असं लक्षात आलं तर काय झालं वगैरे विचारपूस केली जाते. आजारी असतील तर त्यांना आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते, असंही भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. अशा पद्धतीने एकमेकांची काळजी घेणं, कुटुंब म्हणून पक्षातील सदस्यांना वागणं हे त्यांना जमत नाही, म्हणून त्यांना असं वाटतं. मात्र ही आमचे संस्कृती आहे, असं म्हणत पाटील यांनी काँग्रेसला आपले आमदार सांभाळता येत नाहीत, असा टोला लगावला.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

गुप्त मतदान असल्याने विरोधी पक्षांमधले अनेक आमदार सद्सद्विविवेकबुद्धीला स्मरुन मुर्मू यांना मत देतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil slams nana patole over his comment saying bjp brings their mla in bus scsg