शिवराळ भाषा वापरल्याने प्रश्न सुटत नाहीत – चंद्रकांत पाटील
शिवराळ भाषा वापरली की प्रश्न सुटतात असे नाही, तर अभ्यासपूर्ण शांततेच्या चच्रेतूनच प्रश्न सोडविता येतात हे शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे असा प्रतिहल्ला सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पार्टीचे नाव न घेता शनिवारी दिला. मणेराजुरीच्या पाणी परिषदेत या घटक पक्षांनी सरकारला दीड वर्षांत मस्ती आल्याचा आरोप केला होता.
म्हैसाळ योजनेचे आवर्तन आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या हस्ते पंप सुरू न करता शेतकऱ्यांच्या हस्ते पंप सुरू करून मित्र पक्षाच्या राजकीय दबावाला परतून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी मणेराजुरीचे प्रकाश देवर्षी, आरगचे गोपाळ शेळके व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक िशदे यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला.
या कार्यक्रमावर स्वाभिमानी व रासपने बहिष्कार टाकला असल्याने आणि काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिल्याने मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तनात करण्यात आला होता.
पाटील म्हणाले की, चच्रेत अभ्यासपूर्ण मत मांडावे लागते. मात्र कोणत्याही मागणीचा अभ्यासपूर्ण विचार न करता केवळ शिव्याशाप देऊन प्रश्नांची तड लावता येत नसते. काही मंडळी शासना शेतकरी विरोधी असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आम्हीही शेतकऱ्यांची मुले आहोत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तत्कालिक उत्तर शोधण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पाणी योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने भांडवली गुंतवणूक केली आहे. मात्र हा पांढरा हत्ती कायम कार्यरत राहावा यासाठी बिले भरण्यास सांगितले यात कायद्याने हे गरजेचे आहे, याबाबत टीका होते, ही बाब अयोग्य असल्याचे सांगत पाटील म्हणाले की, केवळ शिवराळ भाषेचा वापर केला म्हणून प्रश्नाचे गांभीर्य अधिक चांगल्या पध्दतीने समजते असे कोणी समजायचे कारण नाही. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. आम्हालाही शेतीचे प्रश्न चांगले कळतात, उमजतात.
पाणी पट्टीचे दर एकसारखे असावेत याबाबत ते म्हणाले की, याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. विजेचे पसे ७५ टक्के लाभार्थ्यांनी व २५ टक्के शासनाने असाही प्रस्ताव असू शकतो. मात्र याबाबत पाटबंधारे व वीज मंडळाची भूमिका विचारात घ्यायला हवी. योजना सुरू रहावी यासाठी शासन प्रयत्नशील राहीलच, मात्र याला शेतकरी वर्गानेही प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. योजना कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी ५ मार्च रोजी चर्चा पूर्ण होईपर्यंत बठक आयोजित करण्यात येईल, तत्पूर्वी जतसाठी ४ मार्च रोजी एक दिवसाचा दौरा आढावा घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खा.संजयकाका पाटील म्हणाले की, पाणी योजनेचे राजकारण कोणी करू नये. कारण जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, आरफळ योजनेसाठी पसे भरले जातात, मात्र म्हैसाळसाठी वेगळा न्याय कशासाठी मागितला जातो. यामागे या भागातील शेतकरी आणि शेती व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा डाव राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी विलासराव जगताप, सुरेश खाडे, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पाणी पट्टीसाठी ५ लाखांची मदत आ. सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केली.
या कार्यक्रमाला शिवाजीराव नाईक, मकरंद देशपांडे, राजाराम गरूड, आरग कारखान्याचे अध्यक्ष मनोज िशदे, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे आदी उपस्थित होते. प्रारंभी जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा