मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आवाहनानंतर भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं आहे. यावरून विरोधकांनी भाजपावर टीका करत भाजपाला या पोटनिवडणुकीत पराभवाची भीती होती. त्यामुळेच राज ठाकरेंच्या पत्राचे कारण देऊन माघार घेण्यात आली असा आरोप केला आहे. दरम्यान, या आरोपावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने सांगोपांग विचार करूनच निर्णय घ्यायचा असतो. तसा निर्णय आम्ही घेतला, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Andheri Election: भाजपाने माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हे असे निर्णय…”

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायची सव आहे. जर आम्ही या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नसती, तर ‘एवढ्या लोकांनी आवाहन करूनही माघार घेतली नाही’, असे तुम्हीच बोलले असते. आता आम्ही माघार घेतली, तर स्क्रिप्ट होती वगैरे गोष्टी बोलण्यात येत आहेत. मुळात कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने सांगोपांग विचार करूनच निर्णय घ्यायचा असतो. कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नसतो. अंधेरी पोटनिवडणुकीबाबत परिस्थिती बघूनच देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाने माघार का घेतली नाही, असे विचारताच “राजकारणात आणि समाजकारणात एका निर्णयाची दुसऱ्या निर्णयाबरोबर तुलना करायची नसते. प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी असते.”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Andheri Election: भाजपाची माघार अन् राज ठाकरेंची कौतुकाची थाप; फडणवीसांना पुन्हा पत्र लिहित म्हणाले “आज तुम्ही…”

दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला होता. आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भात निर्णय घेत निडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

Story img Loader