भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारबाबत नवी भविष्यवाणी केलीय. उत्तर प्रदेशमध्ये सात मार्चला विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं की राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. कोठड्या तयार आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सूचक इशारा दिला. ते मंगळवारी (२२ फेब्रुवारी) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.”

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

“सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील”

यावेळी चंद्रकांत पाटलांना दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, “याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील. ‘दूध का दूध, पानी का पानी होईल’, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.”

हेही वाचा : “किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“…यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील”

चंद्रकांत पाटलांनी सरकारच्या ऊस एफआरपी धोरणावरही टीका केली. “महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल,” असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

Story img Loader