मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? हे प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झालेले आहे. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ”मनसेचे संस्थापक राज ठाकरे, यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू. ही राज्यातील सर्वांची संस्कृती आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं? मूळात मी असा अहंकार माननारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कोणी कोणकडे जायचं हा मुद्दा नाही.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा