‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत ‘माझी पोषण परसबाग विकासन मोहीम’ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने व जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या स्वयंसहायता समूहाच्या मदतीने चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५ हजार ३०० वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. यासाठी उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माझी पोषण परसबाग विकासन मोहीम दि.१५ जून ते २५ जुलै २०२० या कालावधीत हाती घेण्यात आली होती. चळवळ पोषणाची – सर्वांच्या सहभागाची या उक्तीप्रमाणे २१ दिवसांच्या मोहीम कालावधीत चंद्रपूर जिल्ह्याला ३ हजार ७५ वैयक्तिक, सामूहिक परसबागा विकसित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टांची पूर्ती करत जिल्ह्याने ५ हजार ३०० वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित केल्या आहेत.

आणखी वाचा- चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूच्या राख्यांना देशभरात मागणी

ही आहे माझी पोषण परसबाग विकासन मोहीम:
गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरी, समुदाय संस्थांच्या सदस्या आणि बालके अशा लाखो व्यक्तींना पुरेशा प्रमाणात सेंद्रीय ताजा भाजीपाला मिळेल व त्यांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी उमेद अभियानामार्फत, माझी पोषण परसबाग विकासन मोहीमेअंतर्गत जिल्ह्यातील महिलांच्या माध्यमातून वैयक्तिक सामूहिक परसबागा विकसित करणे.