ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवर काल ( ६ फेब्रुवारी ) शिंदे गटाने दावा ठोकला आहे. शाखेवर कब्जा केल्यावर शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यक्रर्ते आमने-सामने आले होते. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊतांनी शिंदे इशारा दिला आहे. हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. पण, आमचा शिवसैनिक मागे कुठेही हटणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा हा राडा ठाण्यातच सुरु आहे. कारण, या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतेच मर्यादित आहे. सत्तेचा आणि पोलीस बळाचा गैरवापर होत आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचं काम नाही. पोलिसांच्या आड हल्ले करू नका, समोर या. हे फक्त ठाण्यातच सुरू आहे. मात्र, लवकरच संपेल. खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी हादरल्या आहेत. आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
हेही वाचा : बुरा ना मानो होली है! होळीच्या निमित्ताने सत्यजीत तांबेंचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले…
संजय राऊतांच्या विधानाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं. तेव्हा बावनकुळे म्हणाले, “संजय राऊतांना विनंती करतो की, त्यांनी मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी काम करावं. महाराष्ट्रातील जनता विकास मागत आहे. संजय राऊतांनी मनभेद होणार नाही, अशी विधानं करू नयेत. त्यांनी आमच्या हातात हात टाकून महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्यासाठी काम करावं,” असं आवाहन बावनकुळेंनी केलं आहे.
हेही वाचा : आजोबांसाठी नातू म्हणजे दुधावरची साय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा नातवाचा हट्ट पुरवतात..
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याबद्दल विचारल्यावर बावनकुळेंनी म्हटलं, ” रंगपंचमीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. हे अश्रू पुसले जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. यासाठी भाजपाकडून सरकारला विनंती केली जाणार आहे,” अशी माहिती बानवकुळेंनी दिली आहे.