Chandrashekhar Bawankule Says Rahul Gandhi Supporting Urban Naxal : राहुल गांधी यांना शहरी नक्षलवाद्यांच्या १८० संघटनांनी घेरलंय असं वक्तव्य उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष व कामठी (नागपूर) विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, “फडणवीस बोलले ते खरं आहे. तब्बल १६५ च्या वर शहरी नक्षलवादी विचार असलेल्या संघटना, जनतेच्या मनात देशाबद्दल, समाजाबद्दल द्वेष पसरवणाऱ्या, समाजातील वातावरण गढूळ करणाऱ्या शहरी नक्षलवादी संघटना तयार करण्यात आल्या आहेत. १६५ हून अधिक संघटना कामाला लागल्या आहेत”.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत. राहुल गांधी आज (६ नोव्हेंबर) नागपुरात येत आहेत. तिथे बंद दाराआड चर्चा का करत आहेत? त्यांना तिथे प्रसारमाध्यमं का नको आहेत? एका बाजूला संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि संविधानाने मीडियाला दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम करायचं, असं त्यांचं चालू आहे. ते पुन्हा एकदा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी स्वतःच बोलले आहेत की या देशात आरक्षणाची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ८० वेळा तोडण्याचं काम त्यांच्याच काँग्रेसने केलं आहे.
हे ही वाचा >> राहुल यांच्या ‘गॅरंटी’आधी महायुतीची ‘दशसूत्री’, कोल्हापूरच्या सभेत आश्वासनांचा पाऊस; मविआची आज मुंबईत सभा
राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचं समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत : बावनकुळे
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत केलं आहे. काँग्रेसला बाबासाहेबांचे विचार कधीच रुचले नाहीत, राहुल गांधी हे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधी विचारांचे असून ते संविधानाच्या गोष्टी करत आहेत. राहुल गांधी शहरी नक्षलवादाला पाठिंबा देण्यासाठीच आले आहेत. राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी, त्यांचं समुपदेशन करण्यासाठीच इथे आले आहेत. तुम्हा प्रसारमाध्यमांना तिथे जाऊ दिलं जात नाहीये. अशा कोणत्या चर्चा तिथे होणार आहेत ज्या तुमच्यापासून लपवून ठेवल्या जात आहेत?”
हे ही वाचा >> Abu Azmi : अबू आझमींचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत, शाखेत बसून नागरिकांशी संवाद; शिवसैनिक प्रचार करणार
राहुल गांधींचं नागपुरात संविधान संमेलन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे राहुल गांध हे त्यांच्या प्रचाराची सुरुवातही विदर्भातील नागपूरमधून करणार आहे. ते ६ नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून सायंकाळी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास ‘आघाडीची गॅरंटी’ जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.