वाई: आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शुन्य होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात केला. सातारा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बावनकुळे म्हणाले,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केविलवाणी परिस्थिती आहे. बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो शरद पवार यांना मान्य आहे का असा सवाल केला. त्यांनी साताऱ्यात बुथ कमिटीचा आढावा घेतला.

हेही वाचा…मविआ बैठकीत आ. जयंत पाटील, विश्वजीत कदम यांची झालेली चुकामूक जाणीवपूर्वक की अनावधानाने ?

निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. देशातील इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा एकही उमेदवार नाही. या उलट दरवर्षाला पंतप्रधान बदलायचा असा ते विचार करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानपदापर्यंत जाण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, ते जमले नाही. त्यांचे नाव पंतप्रधान मोदीबरोबर कशासाठा जोडले जाते हेच कळत नाही. आताच्या निवडणुकीत पवार गटाचे सर्व उमेदवार हे पराभूत होणार आहेत.

हेही वाचा…शशिकांत शिंदे यांना अटक व्हावी अशी इच्छा नाही – महेश शिंदे

महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक केली तर महाराष्ट्रात संघर्ष करु, असा इशारा शरद पवार यांनी दिल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर बावनकुळे यांनी, त्यांनी संषर्घ केला तरी जनता हे मान्य करणार नाही. कारण, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पवार यांना मान्य आहे का ? पवार यांनी त्यांना भ्रष्टाचार करण्याचे प्रशस्तीपत्रक दिले आहे का असा सवाल केला. तर शरद पवार यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रशियाचे पुतीन अशी टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर बावनकुळे यांनी कुठे मोदी आणि कुठे पवार. त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे, अशी टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule claims that ncp sharad pawar group s all candidates will be defeated in lok sabha 2024 sharad pawar group going to be zero psg