पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या मनसे या पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक टीका केली आहे. अरे बापरे, एवढ्या मोठ्या पक्षाने पक्षाने भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. आता आम्हाला काळजी घ्यावी लागणार, असे उपहासात्मक भाष्य केले आहे. यावरच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (१७ फेब्रुवारी) अमरावतीमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> ‘तुरुंगात मला जीवे मारण्याचा प्रयत्न,’ संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सकाळी…”

Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

हे अजित पवार यांना शोभत नाही

“राज ठाकरे यांनी आमच्या उमेदवाराला समर्थन दिलेले आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. राज ठाकरे यांच्याबद्दल कोणी उपहासात्मक बोलत असेल तर ते योग्य नाही. राज ठाकरे हे खरंतर हिंदुत्वाच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मजबूत झाला पाहजे, महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांवर गेला पाहिजे, या भावनेने काम करणारे हिंदुत्ववादी विचारचे अत्यंत परिपक्व नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दल उपहासात्मक बोलणे अजित पवार यांना शोभत नाही,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >>> संजय राऊत यांना तुरुंगात मारण्याचा प्रयत्न? पत्रकार परिषदेतील विधानामुळे खळबळ; म्हणाले “मी योग्य वेळी…”

अजित पवार यांना ४४० व्होल्टचा करंट लागला पाहिजे

दरम्यान, प्रचारसभेमध्ये बोलताना चंद्रेशखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अश्विनी जगताप यांच्या विरोधात जे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात अश्विनीताई यांच्यासमोरचे बटण इतक्या जोरात दाबा की, ४४० व्होल्ट करंट लागला पाहीजे. असा करंट लागला पाहिजे की, अजित पवारांनी पुन्हा चिंचवडचे नाव काढले नाही पाहीजे. हा करंट देण्याची ताकद या व्यासपीठावर बसलेल्या लोकांची आहे. ही करंट देण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हा करंट का दिला पाहीजे? कारण लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या आमदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीसाठी उभ्या आहेत. अशावेळी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्यांना हृदय आहे की नाही, माणुसकी आहे की नाही? खरंतर असा लोकांना जागा दाखविण्याची गरज आहे,” असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >>> पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यूप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “एकाच वेळी सगळे…”

दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड या दोन जागांसाठीची निवडणूक महाविकास आघाडी तसेच शिंदे गट-भाजपा यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत विजयासाठी दोन्ही बाजूने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येथून कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.