निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोग, भाजपा तसेच शिंदे गटावर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर शिवसैनिकांना संबोधित केले. हे भाषण त्यानी कारवर उभे राहून केले. याच मुद्द्याला घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

हेही वाचा >>> धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही जाणार? उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं विधान; म्हणाले, “कदाचित…”

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

बाळासाहेबांच्या फोटोची कॉपी करण्यापेक्षा…

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांच्या फोटोंची कॉपी करण्यापेक्षा हिंदुत्ववादी विचारांची कॉपी करा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. “गेल्या अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी तुम्ही कधी घराबाहेर पडला नाहीत आणि आज कारच्या सनरूफचा आधार घेत मातोश्रीच्या बाहेर पडून भाषण करत आहात. पण बाळासाहेबांच्या फोटोची कॉपी करण्यापेक्षा त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांची कॉपी करा,” असे बावनकुळे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना रावसाहेब दानवेंनी राऊतांना डिवचलं; म्हणाले, “त्यांच्या टीकेला…”

उद्धव ठाकरेंच्या भाषणाची बाळासाहेबांच्या भाषणाशी तुलना

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. थेट कारमध्ये उभे राहात त्यांनी हे भाषण केल्यामुळे लोक या प्रसंगाची तुलना बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या एका भाषणाशी करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील १९६९ साली कारवर उभे राहात जोरदार भाषण केले होते.

हेही वाचा >>>निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाल्या, “शिवसेना भवन…”

कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत- केशव उपाध्ये

भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गाडीवर उभं राहण्याची कॉपी करून काही होत नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला. तर कॉपीबहाद्दर कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत, कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघाताने स्वतःच सत्तेवर बसले अशी तुलना करणारं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. एका बाजूला कारच्या बोनेटवर उभे असलेले बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असा फोटोही त्यांनी ट्वीट केला आहे.

Story img Loader