अलीकडील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, अजित पवारांनी आपली भूमिका मांडत चर्चेंला पूर्णविराम दिला आहे. त्यातच अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत अजित पवारांना टोला लगावला आहे. “अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर त्यांना शुभेच्छा आहेत,” असं चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : “युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा”; पुंछमधील दहशतवादी हल्ल्यावरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र!

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात २०० पेक्षा अधिक जागा”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडत नाही. शेवटी राजकारणात संख्याबळ लागतं. राजकारणात तोंडाने मुख्यमंत्री होता येत नाही. प्रत्येक पक्षाची एक क्षमता आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर शुभेच्छा आहेत. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात २०२४ साली २०० पेक्षा अधिक जागा भाजपा आणि शिवसेना जिंकणार आहे,” असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.

“…अन् तेव्हा काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिलं”

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी म्हटलं, “सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होतं. त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी मिळेल अशी शक्यता होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनाही तसेच वाटत होतं. पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले गेले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते.”

हेही वाचा : “आम्ही एकमेकांची गचांडी धरावी आणि…”, फडणवीसांबरोबरच्या राजकीय संबंधावर अजित पवारांची मिश्किल टिप्पणी!

“ठाकरेंबरोबर आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाणांबरोबर नाईलाजाने काम केलं”

“तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केलं,” असा खुलासा अजित पवारांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule on ajit pawar chief minister post statement ssa