काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत, असं कोश्यारी म्हणाले. यावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रसेकडून राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या प्रकरणावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नंदूरबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “…म्हणून राज्यपालांनी शिवरायांचा उल्लेख केला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते आणि अनेक पिढ्यांना राहतील. देशात आणि राज्यात शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर देशाने आणि राज्याने करायला हवा,” असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे.

हेही वाचा : “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीत नको”; शिवरायांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून आव्हाड आक्रमक; म्हणाले, “आता बोचकं…”

राहुल गांधींच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपाने सुरू केलेल्या आंदोलनावर ‘सामना’तील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये धमक असेल तर काँग्रेसधार्जिने पद सोडावे. तसेच, महाविकास आघाडीतून बाहेर पडावे,” असे आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे.

Story img Loader