भाजपा आणि शिंदे गट सत्तेत एकत्र नांदत असला, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्यात स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाद गेल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपा आणि शिंदे गटात सुरू असलेल्या धुसफुशीच्या अनेक घटना चव्हाट्यावरही आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, हा वादातील कळीचा मुद्दा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केलेली नाही. केंद्रीय समिती यावर निर्णय घेईल,” असं बावनकुळेंनी सांगितलं. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : खा. श्रीकांत शिंदेंना लोकसभा निवडणुकीत धडा शिकवण्याची डोंबिवली भाजपची तयारी

ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. पण, शिंदे गटाकडूनही ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर दावा केला जातोय. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “ठाणे आणि कल्याणच्या जागेची अद्याप कुणी मागणी केली नाही. अथवा कुणाला हा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपाची केंद्रीय समिती हा निर्णय घेईल.”

हेही वाचा : कल्याणचा तिढा सुटला, ठाण्याचा संभ्रम कायम

“तसेच, एकनाथ शिंदे, अजित पवार, घटक पक्ष आणि आम्हाला किती जागा मिळणार, हे केंद्रीय समिती ठरवेल. यानंतर त्या जागा ५१ टक्के मतांनी निवडून आणणं, ही आमची जबाबदारी असेल. मोदींच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वोत्तम भारताला साथ देण्यासाठी ४५ खासदार निवडून आणणं, हा आमचा संकल्प आहे,” असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule on kalyan and thane loksabha constituency shrikant shinde ssa
Show comments