भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. पुढच्या वेळी महाराष्ट्रात सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन आहे. याबाबत करारही झाला आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. बावनकुळेंच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपाच्या एका मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सध्या जनतेच्या मनात गोंधळ आहे. वेगवेगळ्या बातम्यांमधून त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. शिंदे गटातील आमदारांनी ५० खोके घेतल्याचे आरोप केले जातात. पण हे आरोप खोटे आहेत. मी २० वर्षांपासून विधीमंडळात काम करत आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मला शिवसेनेचे आमदार किमान ५० वेळा भेटले असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर आम्ही ६५ चे १० झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवसेना संपवण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला आहे.”

हेही वाचा- “अजितदादा राजकारणातले अमिताभ बच्चन”, सुप्रिया सुळेंच्या विधानावर स्वत: अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले, “भावाच्या प्रेमापोटी…”

“पुढच्या वेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील, असा करार झाला आहे. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार असा करार होता. पुढचा करार सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे असा असेल. या कराराच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी आपले सर्व आमदार गमावण्याचा निर्णय घेतला. याची शिंदे गटातील आमदारांना भीती वाटली, म्हणून त्यांनी सत्ता सोडली. त्यांनी खोके वगैरे घेतले नाहीत, हा ‘नरेटिव्ह’ तयार करण्यात आला आहे,” असंही बावनकुळे म्हणाले.