देश आणि गरीब कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्य उभ केलं. त्या नऊ वर्षाच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर संपर्क ते समर्थन अभियान देशात आणि महाराष्ट्रात सुरु आहे. तसेच, अजित पवार आणि आमदारांनी भविष्यातील भारत निर्माण करण्यासाठी समर्थन दिलं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांना सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आलं, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. याबद्दल विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, “राजकारणात बेरजेला महत्व आहे. सरकारमध्ये जे पक्ष आलेत, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशासाठी काय चांगलं करता येईल; याला जास्त महत्व आहे. अजित पवार, भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हे पाऊल आहे.”

sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के

“अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा अनुभव महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी कामात येईल,” असं बावनकुळेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

एक वर्षापासून शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपद दिलं नाही. दोन तासांत राष्ट्रवादीचं आमदार मंत्री झाले असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळेंनी म्हटलं की, “एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार हे कशासाठी आले, हे समजून घेतलं पाहिजे. मंत्रीपदासाठी कोणीही बरोबर येत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि महाराष्ट्राला क्रमांक एक करण्याचा विचार आहे. राजकारणात मंत्रीपदच महत्वाचे आहे का?”

हेही वाचा : ९ आमदारांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद, इतरांसाठीही काही काळ किलकिले – जयंत पाटील

“राजकारणात आमदार-खासदार होणे महत्वाचे आहे का? राजकारणात विकास दडलेला असतो. कधीकधी देशहितासाठी काही गोष्टींची तडजोड करावी लागते. देशहित आणि राष्ट्रहित महत्वाचं आहे. मंत्रीपदासाठी भाजपाचे कार्यकर्ते काम करत नाहीत,” असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.