सोमवारी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं. काल राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांच्या मुंबईतील घरावर मोर्चाही काढला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तारांची मंत्रीमडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली. मात्र, हे सर्व होत असताना विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही अद्यापही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, याबाबत आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, अजित पवार कोणत्यावेळी कोणती भूमिका घेतील, याचा नेम नसतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “शॅडो सीएम अजित पवार शांतच”, सुप्रिया सुळे-अब्दुल सत्तार वादावर मनसेचा सवाल; म्हणे, “दया, कुछ तो गडबड है!”

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची बाजू का घेतली नाही, याबाबतची चर्चा सुरू आहे. त्यावर मला असं वाटतं की हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. मात्र, अजित पवार कोणत्यावेळी कोणती भूमिका घेतील, याचा नेम नसतो. त्यांच्या भूमिकेचा अंदाज व्यक्त करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा अर्थ आपण काढू नये. त्यांचं त्यांनाच माहित असतं”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

हेही वाचा – ‘हर हर महादेव’ वादावर गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मल्टीप्लेक्समध्ये शिरुन तिथल्या लोकांना…”

राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण

दरम्यान, याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. “अजित पवार हे सध्या त्यांच्या आजोळमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेले आहेत. सुप्रिया सुळे त्यांच्या बहीण आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीबाबत अशा प्रकारे भाषा वापरल्यावर सर्वच कुटुंबियांमध्ये नाराजी असेल. पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडतो आहे, त्यात अजित पवारांची भूमिका आहेच. बहिणीला असं बोलल्यावर अजित पवारांनी कोणत्या शब्दात व्यक्त व्हायचं? असा प्रश्न आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule reaction ajit pawar silence on abdul sattar statement on supriya sule spb