मागील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाकडून त्यांना डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच दोन वेळा बीडचा दौरा केला. या दोन्ही वेळी मुंडे भगिनी फडणवीसांच्या कार्यक्रमात दिसल्या नाहीत. यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना ताजी असताना आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडे यांना मंचावरून बोलू न दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पंकजा मुंडे “मला दोन मिनिटं बोलू द्या”, असं म्हणताना दिसत आहेत. तर बावनकुळे ‘नाही’ म्हणत आहेत. या संवादानंतर पंकजा मुंडे आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला आहे.

संबंधित ट्विटमध्ये काँग्रेसनं लिहिलं, “जे स्वतःच्या पक्षातील एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलू देत नसतील, तर ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील… याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!”

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट भाजपात आहे. माझ्या कालच्या संपूर्ण दौऱ्यात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो, असं मी त्यांना म्हटलं,” हाच या व्हिडीओमागील आशय आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule refused pankaja munde to talk on stage viral video shared by congress rmm
Show comments