बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान केलं होतं. त्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “गोवारी हत्याकांड, मुंबई दहशतवादी हल्ला, मावळचा गोळीबार या घटनांत मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘शरदवासी’ म्हणायचं का?,” असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

समृद्धी महामार्गावरील अपघातावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं होतं की, “आमच्या गावातील लोक सांगत होते, एखादा दुसऱ्या अपघातात व्यक्ती गेली. तर, लोक म्हणतात या अपघतात एक ‘देवेंद्रवासी’ झाला. रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण, आज झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दु:खद आहे.”

Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”

हेही वाचा : “मला ‘पप्पू’ म्हणता ना, तुम्हाला…”, आदित्य ठाकरेंचं शिंदे गट आणि भाजपाला थेट आव्हान

“समृद्धी महामार्गासाठी फडणवीसांनी जीवाचं रान केलं”

यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. “समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जीवाचं रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत. वेळेची बचत होत आहे.”

“शरद पवारांनी खालची पातळी गाठली”

“देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. असे सगळे सर्वांना माहित असूनही देवेंद्र फडणवीसांना व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी शरद पवार यांनी गाठली,” अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

“…हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले”

“पवारसाहेब, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले. पवार गोवारी विसरले! पवार मावळचा गोळीबार विसरले..! पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले…! हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले,” असेही बावनकुळेंनी म्हटलं.

“…अन् त्याच रात्री शरद पवार मुंबईला गुपचूप निघून गेले”

“गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता शरद पवार त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे. मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही,” असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “तुमच्या फाइल्स तयार, आमचं सरकार आल्यावर…”, आदित्य ठाकरेंचा मुंबई पालिका अधिकाऱ्यांना इशारा

“कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे दाखवून दिलं”

“पवारसाहेब, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच ‘शरदवासी’ म्हणायचे का? कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले. तुम्ही आज ‘मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे,’ ही म्हणही सिद्ध करून दाखवली,” असं टीकास्र बावनकुळेंनी शरद पवारांवर सोडलं आहे.

Story img Loader