महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने खोटेपणा केला आणि लोकसभेला निवडून आले आहेत. मात्र आता त्यांच्याच नेत्यांना, आमदारांना, खासदारांना असं वाटतं की काँग्रेसमध्ये राहून काही अर्थ नाही. काँग्रेसचे अनेक लोक, जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीतले आमदार खासदार संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“महाविकास आघाडीतले आमदार, खासदार आम्हाला भेटतात. त्यांचं दुःख मांडत असतात. काँग्रेस नेतृत्व निवडून आलेले आमदार खासदार यांच्याशी संपर्क करत नाहीत. काँग्रेस नेतृत्वाचं दुर्लक्ष आहे. काही लोक अस्वस्थ आहेत त्यामुळे पुढे पाहू काय होतं. महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आम्ही ऑपरेशन लोटस वगैरे राबवत नाही. त्याची गरजच नाही. शिवाय त्यांच्यातले लोक फुटल्यावर ते ईडी सीबीआयच्या नावे खापर फोडतात. आम्ही ईडी आणि सीबीआयकडे कधी गेलो नाही. तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात.”

महाविकास आघाडी, काँग्रेसचे लोकप्रनिधी अस्वस्थ -बावनकुळे

महाविकास आघाडीचं अपयश हेच आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी निराश आहेत. विकासाची कामं करण्यासाठी त्यांना पाठिंबा मिळत नाही. पक्ष म्हणून आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. जनप्रतिनिधी म्हणून जी कामं करावी लागतात त्यासाठी जे पाठबळ मिळत नाही. काँग्रेस आणि मविआतली ही परिस्थिती आहे. त्यांना कुणी विचारत नाही त्यामुळे अनेक लोक अस्वस्थ आहेत. काही लोक नेतृत्वावर आणि पक्षावर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि या गोष्टींचा काहीही संबंध नाही असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

आमच्याकडे कुणीही आलं तरीही स्वागतच-बावनकुळे

आमच्याकडे कुणीही आलं तर आमचा पक्ष स्वागतच करतो. जेव्हा कुणी पक्षात येतं किंवा जे अस्वस्थ प्रतिनिधी येणार आहेत त्यांना हे वाटतं की विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. काही लोक विकसित महाराष्ट्राला साथ द्यायची आहे. त्यामुळे आमच्या संपर्कात काही खासदार आणि आमदार आहेत. काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आमच्याशी चर्चा करत आहेत. काही राज्याच्या राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही आज काही फार बोलणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शरद पवार यांची आमची राजकीय भूमिका वेगळी आहे पण..

शरद पवार यांची आणि आमची राजकीय भूमिका वेगळी आहे. पण त्यांच्याबाबत आम्हाला आदर आहे. राजकारणातले ते वरिष्ठ नेते आहेत. अशा नेत्यांबाबत वैयक्तिक टीका करणं योग्य नाही. पक्षाला ही बाब मान्य नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule said mva and congress mlas are in contact with us soon we will decide scj