महाविकास आघाडीची नागपूरमध्ये वज्रमूठ सभा होणार आहे. परंतु या सभेला भाजपाकडून सुरुवातीला विरोध होत होता. परंतु अता तो विरोध मावळला आहे. तसेच भजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील स्पष्ट केलं, की त्यांच्या सभेला आमचा बिलकूल विरोध नाही. बावनकुळे म्हणाले की, त्यांनी सभा घावी. विरोधकांनी मुद्दे मांडले तर सरकारला सुधारणा करता येतात. चार गोष्टींमध्ये बदल करता येतो. परंतु त्यांनी सरकारच्या धोरणावर बोलावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बावनकुळे म्हणाले की, विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर, पक्षीय धोरणावर बोलावं, पण व्यक्तिगत टीका केली तर ती चालणार नाही. या सभेत तसं काही ते बोलले, आमच्या नेत्याचा अपमान केला तर तो अपमान मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही सहन करणार नाही. एकदा आम्ही हा अपमान सहन केला आहे. पण आता तुम्ही देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काही बोललात, आमच्या शीर्ष नेतृत्वातील कोणत्याही नेत्याबद्दल तुम्ही काही बोललात तर आम्ही ते मान्य करणार नाही, ते सहन करणार नाही.

हे ही वाचा >> “…तेव्हा कोणाचे पाय पकडले?” नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांना सवाल, म्हणाले, “लवकरच गौप्यस्फोट…”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तुम्ही जर आमच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही बोललात तर आम्ही आमची भूमिका कशी वठवायची ती वठवू. तुम्ही विकासाबद्दल बोला, राज्याबद्दल बोला, सरकारच्या विविध धोरणांवर बोला आमची त्यावर हरकत नाही. तुम्ही कितीही वज्रमूठ घ्या, अजून कुठल्या मुठा घ्या, आमची त्याला कसलीही मनाई नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule says dont say single word against our leaders in vajramuth rally asc
Show comments