राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथ खडसे यांना रावेर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंबंधी सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या जळगावातील सभेत जयंत पाटील एकनाथ खडसे यांना उद्देशून म्हणाले, रावेर लोकसभेचा धनुष्यबाण तुम्ही उचलावा. तर, एकनाथ खडसे यांनीदेखील जयंत पाटलांच्या विनंतीला अनुकूलता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे म्हणाले, मी लोकसभेची निवडणूक लढवण्यास फार इच्छूक नाही. परंतु, पक्षाने जबाबदारी सोपवल्यास ती जबाबदारी मी निभावेन.

एकनाथ खडसे म्हणाले, १९८९ साली रावेर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह रावेरमध्ये एकूण १० निवडणुका झाल्या. या १० निवडणुकांपैकी नऊ वेळा तिथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. केवळ एकच निवडणूक काँग्रेसला जिंकता आली आहे. काँग्रेसने एकदाच केवळ १३ महिन्यांसाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता. ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने मला आदेश दिला तर मी पक्षाच्या सूचनेचा नक्कीच विचार करेन.

indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
policy will be prepared to resolve issues related to biodiversity parks says madhuri misal
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे ‘बीडीपी’बाबत मोठे वक्तव्य, म्हणाल्या…
Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Ganesh Naik talk about human and wildlife conflict and Solution plan
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यंत आले तर काय…”
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर

दरम्यान, यावर भारतीय जनता पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबत म्हणाले, रावेरमध्ये कोणीही उभं राहिलं तरी आगामी लोकसभा निवडणूक रक्षा खडसेच (रावेरच्या विद्यमान खासदार) जिंकणार. रक्षा खडसे या निवडणुकीत तब्बल दोन लाख मतांनी विजयी होतील.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीत रावेरमधून लढले तरी रक्षा खडसे ती निवडणूक जिंकतील. कारण त्यांनी ज्या पद्धतीने तिथे काम केलंय, नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात आमच्या सर्वच खासदारांनी उत्तम काम केलं आहे. रक्षा खडसे यांनीदेखील मतदारसंघात खूप चांगली कामं केली आहेत. मतदारसंघात त्या पायी फिरल्या आहेत. त्यामुळे रावेरमध्ये कोणीही लढलं तरी रक्षा खडसेच जिंकणार इतकी त्यांची ताकद आहे.

Story img Loader