Chandrashekhar Bawankule on Confusion over Chief Minister of Maharashtra Post : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, महायुतीत पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपाने स्पष्ट केल्यानंतर शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली. दीपक केसरकर तर थेट म्हणाले की मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आता दिल्लीतून घेतला जाईल. या सर्व घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्यामुळे एकनाथ शिंदे आता भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांनी महायुतीकडे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाऐवजी राज्याचं गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे भाजपावर नाराज? गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा, बावनकुळे म्हणाले…
Chandrashekhar Bawankule on Eknath Shinde : महायुतीत सध्या मुख्यमंत्रिपदावरून गोंधळ चालू आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-11-2024 at 13:18 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSएकनाथ शिंदेEknath Shindeचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule says eknath shinde is not unhappy with mahayuti over maharashtra chief minister post asc