शिवसेनेच्या शिंदे गटातील आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असतानाच गेल्या महिन्यात अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्याबरोबर आलेल्या राष्ट्रवादीच्या एकूण नऊ आमदारांना मंत्रीपदं मिळाली आहेत. परंतु, शिंदे गटातील अनेक आमदार अद्याप मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी होत आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू असं सरकारमधील प्रमुख नेते सांगत आहेत. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. राज्यातली सगळी मंत्रीपदं लवकरच भरली जातील अशी अपेक्षा आहे.

cm eknath shinde inaugurates bow string’ arch bridge connecting coastal road sea link
सागरी सेतूमुळे परदेशात आल्याचा भास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Shinde group, NCP Ajit Pawar party,
लाडकी बहीण योजनेतून राष्ट्रवादीने ‘ मुख्यमंत्री ’ शब्द वगळल्याबद्दल शिंदे गटाचा आक्षेप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Ramdas Athawale, Shivaji maharaj statue, sculptor,
शिव पुतळा उभारण्याचे काम नवख्या शिल्पकाराला देणं चुकीचं होतं – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
Aditya Thackeray
मविआ सत्तेत आल्यावर लुटारु मंत्री, अधिकाऱ्यांना कारागृहात टाकणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की नागपूरच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. अधिवेशनासाठी मंत्र्यांनी-आमदारांनी नागपूरला येण्यापूर्वीच त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासगी दौऱ्यानिमित्त साताऱ्याला आले होते. त्यवेळी ते मंत्रिमंडळ विस्तारावर बोलले होते. मुख्यमंत्र्यांबरोबर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी मंडळी उपस्थित असताना एकनाथ शिंदे म्हणाले, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

हे ही वाचा >> खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुन्हा खळ्ळखट्याक् होणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी सगळ्यांना सांगितलंय की…”

दरम्यन, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले, “शिंदे गटाच्या आमदारांचा आता भ्रमनिरास झाला आहे. मंत्रीपदाची उरली सुरली आशासुद्धा आता मावळली आहे. रायगडच्या आमदाराला मंत्रीपदाची आशा होती, ती आता मावळली आहे.” विनायक राऊत यांनी नाव न घेता आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला आहे. मला मंत्रीपद मिळेल तसेच रायगडचं पालकमंत्रीपदही मिळायला हवं, अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी केली होती. त्यामुळे विनायक राऊत यांनी गोगावले यांना नाव न घेता टोला लगावला.