राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला त्यामुळेच आमचं सरकार येऊ शकलं नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा पहाटे शपथविधी पार पडला होता. या भल्या पहाटे झालेल्या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांना सगळं ठाऊक होतं आणि त्यांनीच आमचा डबल गेम केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, शरद पवार यांचा आमच्या भाजपा – राष्ट्रवादी (अजित पवार) सरकारला पाठिंबा होता. परंतु शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी पवारांनी माघार घेतली. यावर आरोपाला उत्तर देताना पवार म्हणाले, मी तीन-चार दिवस आधी माघार घेतली तर मग तुम्ही शपथ का घेतली.

Sharad Pawar, Sharad Pawar latest news,
कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटतात – शरद पवार
chandrashekhar bawankule,
“उद्धव ठाकरेंना अर्थसंकल्प समजत नाही, त्यामुळे…”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका; म्हणाले…
eknath shinde on laxman hakes
लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यांना…”
eknath shinde criticized thackeray group,
“ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू”; रवींद्र वायकरांवरील आरोपाला CM शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “ज्या ठिकाणी…”
NCP MLA Amol Mitkari criticizes Congress state president MLA Nana Patole
“नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये”, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका; म्हणाले, “अतिशय संतापजनक…”
Eknath shinde and nitish kumar
“४०० पारच्या घोषणेमुळे गडबड झाली”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर जदयू नेते म्हणाले, “निवडणुकीत…”
MP Sanjay Raut big statement
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “नितीश कुमार अन् चंद्राबाबू नायडू…”
yogendra yadav on narendra modi bjp
Video: योगेंद्र यादव यांनी भाजपाच्या विजयाचं विश्लेषण करताना दिलं टी-२० क्रिकेटचं उदाहरण; म्हणाले, “समजा अमेरिकेशी…”!

हे ही वाचा >> “त्यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर…”; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपाला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले, “खरं आहे…”

दरम्यान, फडणवीस आणि शरद पवार यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांदरम्यान, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणाले की, शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते केव्हाही डबल गेमच करतात. त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी अशा झाल्या आहेत ज्यांचे आपण दाखले देऊ शकतो. त्यांच बोलणं आणि करणं वेगळं असतं. यात त्यांचा हातकंडा आहे. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घडामोडी आहेत. राजकारणात किंवा सरकार चालवताना, बसवताना (सरकार स्थापन करताना, उतरवताना (सराकर पाडताना) त्यांच्या जीवनात त्यांनी अनेकवेळा असं केलं आहे. त्यांचं बोलणं एक आणि करणं वेगळं अशी अनेक उदाहरणं दिसतील.