राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच दावा केला आहे की, त्यांना भारतीय जनता पार्टीने पक्षात येण्याची ऑफर दिली होती. ते म्हणाले की, “ही ऑफर मी घेतली असती तर महाविकास आघाडी सरकार कधीच पडलं असतं. देशमुख्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर आता भाजपाकडून यावर उत्तरं येऊ लागली आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अनिल देशमुख खोटं बोलत आहेत. त्यांना कोणताही प्रस्ताव नव्हता. मी तोंड उघडलं तर देशमुखांना काही उत्तर देता येणार नाही.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बावनकुळे देशमुखांवर संतापत म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय झालं होतं, ते जर मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील. बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले की, अनिल देशमुख हे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते काही निर्दोष सिद्ध झाले नाहीत, किंवा कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट दिलेली नाही.”

हे ही वाचा >> “शिवसेना फोडण्यात कोण कलाकार होते, एकनाथ शिंदेंनी…” रोहित पवारांचा त्या नेत्याकडे इशारा

…तर आम्हालाही उत्तर द्यावं लागेल : बावनकुळे

बावनकुळे म्हणाले की, “देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा. न्यायालयाने त्यांना केवळ जामीन दिला आहे. क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक आणि संयमाने बोलावं अशी मी त्यांना विनंती करेन. त्यांना कोर्टाने जामीन देताना सांगितलेल्या अटी आणि शर्थींचं त्यांनी पालन करावं. ते भाजपावर टीका करतील, चुकीचं बोलतील तर आम्हाला देखील उत्तर द्यावं लागेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule slams anil deshmukh over his statement on bjp offer asc