अयोध्येतील राम मंदिर हे गेल्या तीन दशकांपासून देशातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. या मंदिरावरून कित्येक पक्षांनी अनेक निवडणुकांमध्ये राजकारण केल्याचं देशातील जनतेनं पाहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी या मंदिराचं उद्घाटन केल्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली होती. अयोध्येतील राम मंदिराचा भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत फायदा होईल असं बोललं जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, तो विषय आता लोकांच्या ध्यानीमनी नाही.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांना प्रश्न विचारला की, अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल का? यावर शरद पवार यांनी एका बैठकीतील घटना सांगितली. शरद पवार म्हणाले, एका बैठकीत काही महिलांनी एक तक्रार माझ्यापुढे मांडली. त्या महिला म्हणाल्या, हे लोक (भाजपा) रामाचं (श्रीराम) सगळं करतात, पण मंदिरात सीतेची मूर्ती का बसवत नाहीत?

yogi Adityanath told mahavikas aghadi problem
काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

हे ही वाचा >> शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीने आक्षेप नोंदवला आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात.

हे ही वाचा >> Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्र्यांसह माजी राज्यपालांचं भवितव्य पणाला

बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं, जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल.