सावंतवाडी : हिंदू सनातन धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्या स्टॅलिन सोबत युती करणारे उद्धव ठाकरे, देव देश आणि संस्कार संपवायला निघाले आहेत. त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग जिल्हातील जनता गाडल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा कणकवली येथील चौक सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. भारत हा देशातील सर्वाधिक बलाढय़ देश बनविण्यासाठी कमळ समोरील बटन दाबून मोदींना मतदान करायचे.आणि महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कणकवली एसटी स्टँड समोर चौक सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. व्यासपीठावर  माजी खासदार नीलेश राणे, भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,प्रमोद जठार, राजन तेली,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला जिल्हाध्यक्षा कोरगावकर, संपर्क प्रभारी शैलेंद्र दळवी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> “माझ्या बॅगेत आठ शर्ट, एकावर शाई फेकली की दुसरा घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला…”, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

कोकणात एकेकाळी भाजपची अशी बिकट परिस्थिती होती की भाजपचा झेंडा लावण्यासाठीही कार्यकर्ता मिळत नव्हता. मात्र, आज ५१ टक्के भारतीय जनता पार्टी बनविण्याचे काम येथील नेते व कार्यकर्त्यांनी केले आहे त्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला सार्थ अभिमान आहे. शेवटी जिंकण्याला महत्त्व आहे. आमदार नितेश राणे यांनी विजयाची खात्री देत तिन्ही ठिकाणी कमळ चिन्ह मागितलं आहे. त्यामुळे या मागणीचा नक्कीच विचार हाईल व सावंतवाडीतील कार्यकर्त्यांना नाराज केलं जाणार नाही अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावंतवाडीत दिली.

हेही वाचा >>> सातारा : पालकमंत्र्यांच्या घरासमोरच दाम्‍पत्‍याचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न

सावंतवाडी शहरातील भाजप प्रदेश वॉर रूम कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सोशल मीडिया प्रमुख नवनाथ बन, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रथमेश तेली, जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, संध्या तेरसे, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब आदी उपस्थित होते.श्री बावनकुळे म्हणाले, या वॉर रूम कार्यालयामुळे केंद्र व राज्यातील विविध योजना आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. जिल्ह्यात भाजप नंबर वन ठरला आहे. येथील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमूळेच हे शक्य झाले आहे. दरम्यान प्रदेश सचिव डॉ नीलेश राणे यांनीही यावेळी उपस्थिती दर्शविली होती.