मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं. मी मुंबईत नरेंद्र मोदींच्या नरड्यावर बसायला जात आहे, अशा आशयाचं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मुंबईत होणारी बैठक ही ‘इंडिया’ची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप‘ म्हणत आहात, ती गरूड झेप नाही. ही पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली. करोना काळात कोट्यवधींची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत,” अशी टीका बावनकुळे यांनी ट्वीटद्वारे केली.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
PM Narendra Modi On Mahavikas Aghadi
PM Narendra Modi : “महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; म्हणाले, भ्रष्टाचारात काँग्रेसची पीएचडी”

हेही वाचा- भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली? रोहित पवारांचं थेट भाष्य, म्हणाले…

“तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदींना जेवढ्या शिव्या द्याल, तेवढं जनता मोदींवर जास्त प्रेम करेल,” असंही बावनकुळे म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिलं की, “महात्मा गांधीजींनी मुंबईतून ‘क्विट इंडिया‘चा नारा दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्यासारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे. मोदींचा तुमच्या (I.N.D.I.A.) विरोधातील संघर्ष हा स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी नाही, तर देश वाचवण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव ‘ अजेंडा घेऊन बैठका करा. देशातील कोट्यवधी लोकांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदींचं देशसेवेचं कार्य अखंड सुरू राहणार आहे.”