आसाराम लोमटे

भोंगे, हनुमान चालिसा यावरून वातावरण तापलेले असताना आणि धार्मिक रंग देत अस्मितेच्या मुद्द्यांनी सामाजिक वातावरण ढवळून निघाले असताना जिल्ह्यात गोदाकाठी असलेल्या मुंबर या गावाने वर्षानुवर्षे सामाजिक सलोख्याचा वारसा जपला आहे. गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’ साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. सध्या या गावात हा सप्ताह सुरू आहे.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

पूर्णा तालुक्यातील मुंबर हे दीड-एक हजार लोकसंख्येचे गाव. गावात मारुती, ज्योतीबा, काळोबा ही मंदिरे आहेत. या श्रद्धास्थानांबरोबरच हाजी साहेब पीर सुद्धा गावात आहे. गावकरी सारख्याच श्रद्धेने या सर्व ठिकाणी जातात. सध्या मोहरम यात्रा सुरू आहे. त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दररोज गावात अन्नदान सुरू आहे.

हाजी साहेब पीर या श्रद्धास्थानी गव्हाची खीर केली जाते. मोहरमनिमित्त सवारी, डोले पार पडतात. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सवाऱ्यांची पूजा केली जाते. श्रद्धाळू या ठिकाणी ऊद घालतात, पेढे-साखर वाटतात. हाजी साहेब पीर या ठिकाणी असलेले निवृत्ती महाराज शिंदे हे रमजानच्या महिन्यात ‘रोजा’चे उपवास करतात. संपूर्ण महिनाभर ते अनवाणी वावरतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता आहे.

सध्या सप्ताहाच्या निमित्ताने गावात अन्यही सामाजिक उपक्रम सुरू आहेत. गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या विवाह सोहळ्यापासून ते आरोग्य शिबिरापर्यंत अनेक उपक्रम पार पाडले जातात. केवळ मुंबर या गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्येही हाजी साहेब पिराविषयी लोकांच्या मनात आस्था आहे. गेल्या ३७ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून ती श्रद्धेने जपली जात आहे, अशी प्रतिक्रिया सखाराम शिंदे यांनी दिली.

गावात एकही मुस्लीम कुटुंब वा व्यक्ती राहत नाही. तरीही मोहरमची परंपरा सुरू आहे. मोहरमच्या यात्रेनिमित्त जे अन्नदान होते त्यात हजारो लोक सहभागी होतात. शेवटच्या दिवशी सवारी व डोले यांची पूजा केली जाते. मोहरम ऑगस्ट महिन्यात येत आहे. त्या वेळी पावसाळ्यात गावात मोठा कार्यक्रम घेणे शक्य होत नाही त्यामुळे मोहरम यात्रेनिमित्त सध्या भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत. असे निवृत्ती महाराज शिंदे (देवकर) यांनी सांगितले. सध्या सर्वत्र धार्मिक अस्मितेच्या नावावर वातावरण ढवळले जात असताना मुंबरकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा आदर्श जपला आहे.